सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

कविता


विझलो आज जरी मी, 
हा माझा अंत नाही..... 
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...ll

छाटले जरी पंख माझे, 
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला, 
अजुन अशी भिंत नाही ..

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे.. 
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर.. 
डोळ्यांत जरी गेली धूळ, 
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो.. 
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही .... 
- सुरेश भट

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

पुरातत्त्वशास्राचेही सांस्कृतिक राजकारण

पुरातत्त्वशास्त्राचेही सांस्कृतिक राजकारण...

पुरातत्त्वशास्त्रातील अग्रगण्य संस्था असणाऱ्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून हरियाणातील राखीगढी इथे उत्खनन-संशोधन करत आहेत. या उत्खननातून बाहेर येणाऱ्या पुराव्यांमधून जुनी गृहितकं बदलून अनेक माहिती चुकीच्या पद्धतीने नव्याने समोर येत आहे. भारतीयांच्या मुळाचा प्रश्न सुटला आहे असे वातावरण त्यातून निर्माण झाले. या दाव्यांना "सेल' आणि "सायन्स' या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेला आहे. मात्र मूळ शोधनिबंध न वाचताच पुरातत्त्वशास्त्राचा सांस्कृतिक राजकारणासाठी कसा उपयोग केला जातो यावरची ही सखोल आणि अभ्यासपूर्ण रोखठोक मते...

"आर्य मूळचे भारतातलेच... आर्य आक्रमण सिद्धांत चुकीचा... हडप्पा संस्कृतीचे लोक संस्कृत भाषा बोलत... त्यांची संस्कृती वैदिक होती... आजच्या भारतीयांमध्येही तीच जनुके झिरपत आलेली असून या लोकांची आनुवांशिकी स्वतंत्र आहे. परकीयांचा त्यावर नगण्य प्रभाव आहे,' असे दावे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू व हरियाणाच्या राखीगढी येथील उत्खननाचे प्रमुख डॉ. वसंत शिंदे यांनी केले. ते सर्व भारतातील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आणि खळबळ माजली. भारतीयांच्या मुळाचा प्रश्न सुटला आहे असे वातावरण त्यातून निर्माण झाले. या दाव्यांना "सेल' आणि "सायन्स' या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेलेला होता आणि या दोन्ही शोधनिबंधांचे डॉ. शिंदे हे प्रमुख सहलेखक असल्याने हे दावे सत्यच आहे असा आभास निर्माण होणे स्वाभाविक होते. मूळ लेख सहसा जनसामान्य वाचण्याच्या भानगडीत पडत नसल्याने या विधानांमागचे संघप्रणीत सांस्कृतिक सहज पुढे नेता येणे शक्य झाले. पण आपण वस्तुस्थिती तपासून पाहिली पाहिजे. पुरातत्त्वशास्त्राचा सांस्कृतिक राजकारणासाठी उपयोग करणे गैर असले तरी असे झाले आहे हे दुर्दैव आहे.

पहिली बाब म्हणजे "आर्य' हा शब्दच मुळात दोन्ही शोधनिबंधांमध्ये वापरलेला गेलेला नाही तर इंडो-युरोपियन भाषा बोलणारे पूर्व युरोपातील 'स्टेपे' येथील भटके पशुपालक हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यांचे इराणमार्गे स्थलांतर इसपू दोन हजार ते एक हजार या काळात सुरू झाले व ते कधीतरी नंतरच्या टप्प्यात पण इसपू एक हजारच्या आधी भारतात आले. नंतरच्या उत्तर भारतीय रहिवाशांमध्ये (म्हणजे आजच्या) इराणी व स्टेपे भागातील भटक्या पशुपालकांच्या जनुकप्रवाहाचे प्रमाण जास्त (म्हणजे अधिकाधिक ३०%) आहे. इंडो-युरोपियन भाषा त्यांनीच आपल्या सोबत आणल्या असाव्यात व त्यांचा उत्तर भारतात प्रसार झाला. राखीगढी येथील स्त्रीचा सांगाडा आहे तो इसपू २६०० मधला. म्हणजे आजपासून ४६०० वर्षे जुना. त्या सांगाड्यातील जनुकांत मात्र स्टेपे जनुकप्रवाहाचे अस्तित्व नाही. इराणी जनुकांचे प्रमाण नगण्य स्वरूपात आहे, पण सिंधू संस्कृतीच्या व्यापारामुळे या प्रदेशाशी येणाऱ्या नित्य संबंधांमुळे हा जनुकप्रवाह किंचित झिरपला असावा असे निष्कर्ष काढले असून एकाच सांगाड्यातून मिळालेल्या जनुकांमधून काढला गेलेला निष्कर्ष परिपूर्ण असणार नाही. यासाठी अधिक नमुन्यांना शोधून त्यांच्याही जनुकांचा सिक्वेन्स लावला पाहिजे, अशीही सूचना शोधनिबंधात केलेली आहे.

हे झाले मूळ शोधनिबंधांत काय आहे याचा सारांश. या लेखांचे सहलेखक जगमान्य बहुशाखीय विद्वान आहेत. या सारांशावरून लक्षात येईल की, वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या दाव्यांत आणि शोधनिबंधातील निष्कर्षात यत्किंचितही साम्य नाही. आर्य इथलेच, सरस्वती नदी म्हणजे घग्गर नदी, वेदरचना येथेच झाली वगैरे दावे रा. स्व. संघप्रणीत विद्वान गेली अनेक दशके करत आलेले आहेत. गेल्या शतकाच्या सुरुवातीला आक्रमक आर्यांनीच सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली असे मत प्रचलित होते. पण त्यामुळे आक्रमक आर्य विरुद्ध द्रविड असा एक सांस्कृतिक, अनेकदा हिंसकही झालेला संघर्ष पेटला, तर दुसरीकडे मूलनिवासीवादही जन्माला आला. त्यामुळे स्वत:ला वैदिक आर्य समजणारे, सांस्कृतिक वर्चस्वतावाद जपणारे वैदिक धर्मीय अस्वस्थ झाले आणि आपण मूळचे इथलेच हे सांगायला सुरुवात केली. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच असेही रेटून सांगायला सुरुवात केली. म्हणजे विध्वंसकर्ते ते थेट निर्माते असली कोलांटउडी घेतली गेली. त्यासाठी काही पुरातत्त्वीय पुराव्यांशी छेडछाड करण्यातही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. 

सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत वैदिकांना प्रिय असलेल्या घोड्यांचे अवशेष मिळालेले नव्हते. त्यामुळे सिंधू संस्कृती वैदिकांचीच आहे असे ठरवायला अडचण येऊ लागल्यानंतर एन. एस. राजाराम व एन. झा या लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहीत होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली व बैलाच्या प्रतिमेला चक्क घोड्यात बदलवले. हा प्रकार हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी फ्रंटलाइनमध्ये (ऑक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आणला. आर्य वंश आणि वैदिक संस्कृती याची संघमोहिनी अचाट आहे. आता तर जनुकीय शास्त्राचा असाच उपयोग केला गेला आहे. डॉ. शिंदेंच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या दाव्यांवरून ते केवळ संघप्रिय सिद्धांतांचीच री ओढत आहेत हे स्पष्टच आहे. पण खुद्द ज्या शोधनिबंधांचे जे स्वत: सहलेखक आहेत ते शोधनिबंध त्याच्याच दाव्यांची पुष्टी करत नाहीत हे उघड आहे. याला आपण सांस्कृतिक राजकारण व वर्चस्वतावादासाठी शास्त्राची हत्या असेही म्हटले तर वावगे होणार नाही.

पहिली बाब अशी आहे की, कोणाच्याही जनुकांवरून त्या व्यक्तीची भाषा, अाध्यात्मिक संस्कृती समजत नाही तर तो केवळ तर्क असतो. तर्क हे वास्तव असतेच असे नाही. स्टेपेमधील भटके पशुपालक इंडो-युरोपियन भाषांचे निर्माते होते यालाच कसलाही पुरावा नाही. ऋग्वेद व पारशी धर्माचा धर्मग्रंथ अवेस्त्यात भाषा, धर्मकल्पना, देव-देवता, याज्ञिक कर्मकांड यात अतोनात साम्य आहे. एकाच भुप्रदेशात, म्हणजे इराणमध्ये या दोन्ही धर्मांची एकाच काळात निर्मिती झाली हे उघड आहे, कारण ऋग्वेदातील नोढस गौतम हा ऋषी अवेस्त्यात समकालीन म्हणून वावरतो तर खुद्द जरथुष्ट्र ऋग्वेदात वावरतो. हे लिखित पुरावे आहेत व या दोन्ही धर्मांची निर्मिती इसपू १५०० च्या मागे जावू शकत नाही, असे सर्वच (संघी सोडून) विद्वानांचे मत आहे. इसपू १५०० मध्ये सिंधू संस्कृतीचा प्राकृतिक कारणाने ऱ्हास होऊन गेला होता. त्यामुळे सिंधू संस्कृतीची निर्मिती वैदिक आर्यांची हा दावा फोल आहे, असा दावा डॉ. शिंदे सहलेखक असलेल्या शोधनिबंधांतही केला गेलेला नाही.

शोधनिबंधातील निष्कर्षांचा अर्थ असा लावता येतो की, सिंधू संस्कृतीचे निर्माते येथीलच होते. त्यांच्या जनुकप्रवाहात किमान इसपू २००० पर्यंत कसलेही बाह्य प्रादुर्भाव झालेले आढळत नाही. येथील कृषी संस्कृतीही स्वतंत्ररीत्या विकसित झाली आणि त्यातूनच सुफलनतायुक्त शैवप्रधान धर्माचा उदय झाला. इसपू २६०० मधील स्त्रीच्या सांगाड्यात ही स्टेपेची जनुके मिळून येत नाहीत. कारण तेव्हा हे लोक युरोपातून इराणमध्येही आलेले नव्हते. डेव्हिड राइश यांच्या मते त्या काळात सिंधू संस्कृतीची भाषा इंडो-इराणी पूर्व व स्वतंत्र होती. इराणी जनुकप्रवाह इसपू २००० नंतरच स्टेपेच्या जनुकांनी प्रभावित व्हायला सुरुवात झाली. स्टेपेच्या लोकांचा धर्म कोणता होता याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि ते का स्थलांतरित झाले याचे सबळ उत्तर अद्याप गवसलेले नाही. शिवाय स्टेपेतील लोक स्टेपेमध्ये जगाच्या कोणत्या भागातून आले होते हेही आपल्याला आज तरी माहीत नाही.

पण ते लोक इसपू २००० नंतर इराणमध्ये आले व स्थायिक झाले. त्यांची पुढे भारतात प्रवेशण्याची प्रक्रिया सन १५०० नंतर सुरू झाली. तोवर त्यांच्याही जनुकांत इराणी जनुकांचा संसर्ग झालेला होता. मिश्र जनुकांचे काही वैदिक धर्मीय इराणी लोक इसपू १२०० नंतर भारतात आपला धर्म घेऊन आले व धर्मप्रचाराच्या माध्यमाने काही घटकांत तो धर्म पसरवला. भारतात इराणमार्गे येणारे सर्वच वैदिक धर्मीय असू शकत नव्हते. कारण इराणमध्येच तेव्हा वैदिक, अहूर माझ्दा व वेगळ्या देवता पुजणाऱ्यांचे अनेक धर्म होते. त्यांच्यात धर्मबदल व धर्मसंघर्ष ही नित्याची बाब होती. याचे पुरावे ऋग्वेद व अवेस्त्यातच येतात. त्यातीलही काही टोळ्यांनी भारतात प्रवेश केला असणार हे उघड आहे. त्यामुळे भारतीयांत इराण-स्टेपेची जनुके आली ती केवळ वैदिक आर्यांची होती हे मतही योग्य नाही, भारतात या भागांतून स्थलांतर-आक्रमणे होण्याची परंपरा शक-कुशाण काळापर्यंत चालू असलेली आपल्याला ज्ञात इतिहासावरूनच दिसते.

खरे म्हणजे माणूस आपली पाळेमुळे शोधण्यासाठी खूप सजग असतो आणि त्यात वावगेही काही नाही. नवनव्या पुराव्यांनी आधीच्या समजुती बदलत राहतात. पण ही प्रक्रिया निकोप असावी लागते. जनुकीय शास्त्र या प्रक्रियेत मदत करणारे असले तरी ते परिपूर्ण आहे असा दावा करता कामा नये. कारण अजून पुरातन सांगाडे प्रकाशात आले व त्यांचे निष्कर्ष वेगळे निघाले तर आधीचे नि:ष्कर्ष बाद होऊन तोही शोधाचा एक टप्पा समजून पुढे जावे लागेल. शास्त्र असेच पुढे जात असते.

पुरातत्त्वविदांनी आपल्या शोधांतील निष्कर्षांशी प्रामाणिक असले पाहिजे ही अपेक्षा असते. पण डॉ. शिंदेंनी शोधनिबंधांत एक आणि जनतेला सांगायला मात्र आपली संघ अथवा कोणाच्याही मताने प्रभावित भलतेच दावे करावेत हे सर्वस्वी गैर आहे. त्यांनी अद्यापही माध्यमात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दाव्यांना नाकारलेले नाही किंवा ते दावे मागेही घेतलेले नाहीत यावरून शास्त्राची केवढी अप्रतिष्ठा होते आहे हे लक्षात यावे. सांस्कृतिक श्रेष्ठत्वतावादातून हा प्रकार घडत आला आहे हे उघड आहे. वाचकांनी सेल' आणि सायन्स'मधील मूळ शोधनिबंध वाचले पाहिजेत, मगच असल्या पोकळ दाव्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवले पाहिजे.

(Published in Divya Marathi, Rasik supplement)

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

स्वार्थी क्रांतीकारक.... माहिती


 

TOP NEWS

स्वार्थी क्रांतीकारक!

माओ ची क्रांती, कोण होता हा माओ-त्से- तुंग? ज्याने हिंदी चीनी भाई भाई म्हणत भारतावर 1962 साली आक्रमण केले? वाचा माओचा इतिहास... ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत यांच्या लेखातून

BY भारत कुमार राऊत

SEPTEMBER 11, 2020

जगाच्या नकाशावर जन आंदोलनांतून राज्यक्रांती घडवून आणणाऱ्या मूठभर नेत्यांपैकी एक माओ-त्से- तुंग. त्यांचा स्मृतीदिन. भारतीयांमध्ये उत्सुकता, प्रेम, तिरस्कार व संताप या सर्व भावना जागृत करणारा हा खऱ्या अर्थाने जन नेता. चीन या महाप्रचंड देशाला जागतिक नकाशावर आणणाऱ्या माओने चिनी सत्ता व जनता यांना एकाच वेळी जगापासून तोडलेसुद्धा.

कोणत्याही प्रचलीत सिद्धान्तापेक्षा वेगळा असा ‘माओवाद’ त्याने जगाला दिला. कम्युनिस्ट विचारसरणीचा उद्घाता कार्ल मार्क्स याने कामगाराला क्रांतीचा ‘दूत’ मानले. त्यानुसार रशियन क्रांती झाली. पण माओने साम्यवाद स्वीकारतानाच चीनमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आपल्या चळवळीची उभारणी केली. ही यशस्वीरित्या राबवली.

माओचा जन्म २६ डिसेंबर १८९३ रोजी चीनच्या हूनान प्रांतातील षाओषान या गावी झाला. त्यावेळी चीनमध्ये मांचू घराण्याची राजवट होती. मांचू घराण्याविरूद्ध चीनमध्ये लोकशाहीवादी चळवळीला सुरूवात झाली. १९११ मध्ये कुओमिंतांग पक्षाने राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही स्थापन करण्यास पुढाकार घेतला. त्या पक्षाचे एक सक्रिय सदस्य म्हणून माओ त्या काळात ओळखले जात.

Courtesy: Social Media

१ जानेवारी १९१२ रोजी सन्यत्सेन यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये नवे सरकार स्थापन करण्यात आले. त्यावेळी नव्या लोकशाही सरकार विरूद्ध लष्करी सत्ता उभी होण्याचा प्रयत्‍न करू लागली. सन्यत्सेनच्या मृत्यूनंतर चॅंग कै शेक हे पक्षप्रमुख झाले. तेव्हा मार्क्स-लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित होवून माओंनी चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मात्र, चीनमध्ये कामगाराऐवजी शेतकर्‍याला महत्त्व देण्यात आले.

१९२० पासून माओ नव्या पक्षात सक्रिय झाले, तर चॅंग कै शेक हे आपल्या क्वोमिंतांग पक्षाशीच एकनिष्ठ राहिले. सरंजामशाहीविरूद्ध चळवळ उभी करणे. हेच माओ यांचे मुख्य ध्येय बनले. या कामासाठी जुन्या क्वोमिंतांग पक्षाचीही मदत घेण्याचे ठरले होते.

१९२७ येईपर्यंत क्वोमिंतांग-कम्युनिस्टांचे सख्य संपल्यावर क्वोमिंतांग पक्षाच्या लोकांची सर्रास कत्तल सुरू झाली. तर दुसरीकडे माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकर्‍यांना वाटण्यास सुरूवात केली. यामुळे माओंना लोकांचा पाठिंबा मिळू लागला. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर १९३० पासून चॅंग कै शेक यांच्या क्वोमिंतांग पक्षाविरूद्ध कम्युनिस्ट रेड आर्मीचे युद्ध् सुरू झाले. कम्युनिस्टांविरुद्ध काढण्यात आलेल्या चार मोहिमांमध्ये चॅंग कै शेकना अपयश आले. मात्र, पाचव्या मोहिमेत चॅंग कै शेकना यश आले. कम्युनिस्टांना युद्धातून माघार घ्यावी लागली.

Courtesy: Social Media

हा पराभव माओ यांच्या जिव्हारी लागला. आपले ८५ हजारांच्या वर सैन्य, १५०० वर सैनिक घेऊन माओ चीनमधील ११ प्रांतांत वर्षभर फिरत राहिले. इतिहासात प्रसिद्ध झालेला हाच तो ‘लॉगमार्च’. ही प्रदीर्घ पदयात्रा वर्षभराने षा’न्शी प्रांतात पोहोचली. माओंना त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविता आले होते, लोकांनी त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दिला. एकीकडे माओंचा हा ‘लॉंग मार्च’ सुरू असतांना जपानने चीनवर आक्रमण केले. यावेळी क्वोमिंतांग आणि कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन जपानी सेनेविरूद्ध लढा द्यावा. अशी भूमिका माओंनी घेतली. दोन्ही पक्षांत मतभेद दिसताच चॅंग कै शेकला अटक करण्यात आली. पण परक्या सेनेसमोर मतभेद उघड होऊ नये म्हणून लगेच चॅंग कै शेकची सुटका करण्यात आली.

१९३८ ते १९४५ या काळात माओंच्या नेतृत्वात दोन्ही पक्षांच्या सहकार्याने जपानशी युद्ध झाले. १९४५ साली दुसर्‍या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर अमेरिकेने कम्युनिस्टांविरूद्ध चॅंग कै शेकला लष्करी मदत दिली. या मदतीमुळे १९४६ पासून क्वोमिंतांग विरूद्ध कम्युनिस्ट असे सरळ युद्ध सुरू झाले. अखेर १९४९ साली चॅंगच्या क्वोमिंतांग पक्षाचा दारूण पराभव झाला.

१ ऑक्टोबर १९४९ ला माओंच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जनता-प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या प्रजासत्ताकाचे सर्व कामकाज सोव्हियेत संघातील पद्धतीने करण्याचे ठरविले गेले. पण हळूहळू माओंच्या लक्षात आले. की, आपल्या देशातील कार्य पद्धती सोव्हियत संघासारखी न ठेवता सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकर्‍याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. लोकांकडून घेऊन लोकांना परत देणे. अशी पद्धत सुरू झाली. ही नवी पद्धत वापरून शेती, विज्ञान, उद्योग अशा सर्व क्षेत्रात चीनने प्रगती केली.

९ सप्टेंबर १९७६ला माओ यांचे निधन झाले. माओचे कलेवर आजही बीजिंगमधल्या तियानमेन चौकात जपून ठेवण्यात आले आहे. हजारो चिनी व परदेशी पर्यटक तिथे दररोज गर्दी करतात. माओ त्यांच्या देशांतल्या शेतकऱ्यांचा मित्र व नेता असला तरी भारताशी मात्र, त्याने गद्दारीच केली. पंडित नेहरूंच्या बरोबर एका बाजूला ‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या घोषणा करत त्याने व चाऊ-एन-लायने नेहरूंना गाफील ठेवून ॲाक्टोबर १९६२ ला भारतावर हल्ला करून मोठा भूभाग ताब्यात घेतला.

Courtesy: Social Media

माओने चीनमध्ये अनेक जगावेगळे प्रयोग केले. त्यातले अनेक यशस्वी झाले. तर काही फसलेसुद्धा. पण अपयशांची पर्वा न करता माओ प्रयोग करतच राहीले. एक वर्षभर जन्मदर शून्यावर आणण्याचा प्रयोग त्यांनी केला तसेच देशांतील सर्व बुद्धीजीवींना नोकऱ्या सोडून शेतावर राबण्यास त्यांनी भाग पाडले. ‘स्वार्थ’ हाच माओचा स्वभाव व राजकारण यांचा स्थायीभाव होता. चिनी राजकारणाचा आजही तोच गाभा आहे.


वेताळ

कोकणातील वेताळ अथवा वीर प्रतिमा भूत, पिशाच्च आणि प्रेतात्मे यांचा अधिपती मानला जाणारा वेताळ हा शिवप्रभूंचा एक गण म्हणून ओळखला जातो. शिव हा न...